आज दिवसभरात... 8 फेब्रुवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 08 Feb 2019 11:57 PM
रविवारी मध्य रेल्वेच्या कल्याण-टिटवाळा दरम्यान दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत. मनमाड येथून सुटणारी राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेस तसेच जनशताब्दी एक्सप्रेस आणि भुसावळ-मुंबई पेसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या असून नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस ही गाडी नाशिक पर्यंत जाऊन तेथून पुन्हा नागपूरकडे जाणार असल्याचे मध्य रेल्वे कडून कळविण्यात आले आहे.
धारावी सायन रोडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, आग विझविण्याचे काम सुरु
मायावतींना सुप्रीम कोर्टाचा दणका, पुतळे उभारण्यावर खर्च केलेले पैसे परत करा
एसटी महामंडळाची 8 हजार 22 चालक तथा वाहक पदांची भरती, हलके वाहन चालविण्याचा 1 वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही अर्ज करता येणार
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींची तब्येत खालावली, आंदोलक शुभांगी जाधव अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल
एसटीच्या शिवशाही 'शयनयान' बसच्या तिकीट दरात भरघोस कपात. किमान 230 ते 505 रूपये कपात, परिवहन मंत्री रावतेंची घोषणा




भूकंपाच्या कारणानं मृत झालेल्या वैभवी भुयाळ या मुलीच्या कुटुंबियांना 4 लाखाची मदत आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघर येथे देण्यात आली


शिवाजी पार्कवर होणाऱ्या 'मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिप' शांततेतच पार पडणार, स्पीकरच्या वापराबाबत कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, विश्व मल्लखांब फेडरेशन आणि समर्थ व्यायाम मंदीरची हायकोर्टात याचिका, 16 आणि 17 फेब्रुवारीला होणाऱ्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग
अंधेरी एमआयडीसी येथे आग, फायरब्रिगेडच्या 4 गाड्या घटनास्थळी, नंदकिशोर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग
लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे शरद पवार यांचे संकेत, माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू : शरद पवार, माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट होणार?
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला युक्तिवाद करणार. राज्य सरकारतर्फे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी बाजू मांडणार. याच दरम्यान 16 टक्के आरक्षणाच्या समर्थनार्थ याचिका दाखल करणाऱ्यांना युक्तिवादाची संधी मिळणार, हायकोर्टाचं स्पष्टीकरण
सातारा : धोम बलकवडी कालवा फुटला, अनेकांची शेती वाहून गेली, लाखो रुपयांचं नुकसान, रस्ता आणि विहिरी तुडुंब, फलटण आळजापूर इथली घटना
सातारा : धोम बलकवडी कालवा फुटला, अनेकांची शेती वाहून गेली, लाखो रुपयांचं नुकसान, रस्ता आणि विहिरी तुडुंब, फलटण आळजापूर इथली घटना
पालघर
: डहाणू तलासरी भागात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरुच, काल 6.19 वाजता 3.3 रिश्टरस्केल तर रात्री आणि पहाटेपर्यंत दोन मोठे धक्के बसल्याची माहिती, पालघरमध्ये आज मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार

बैकग्राउंड

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. देशात वायुसेना दुबळी करण्याची काँग्रेसची इच्छा, लोकसभेतील भाषणात मोदींचा काँग्रेसवर घणाघात, मोदींच्या आरोपांवर राहुल गांधींचंही प्रत्युत्तर

2. राज्यातील मेगाभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात, 4 हजार पदांसाठी तब्बल साडेसात लाख अर्जदारांची नोंदणी, एका पदासाठी 178 अर्जदारांमध्ये स्पर्धा

3. बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून काल नऊ तास मॅरेथॉन चौकशी, उद्या पुन्हा चौकशीची शक्यता

4. दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार तुफान पावसासह गारपीट, रस्त्यांवर बर्फाची चादर, पारा आणखी घसरला

5. भारत-न्यूझीलंडदरम्यान आज दुसरा टी-20 सामना, मालिकेतलं आव्हान राखण्यासाठी विजय आवश्यक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.