आज दिवसभरात... 30 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 30 Jan 2019 09:44 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाआघाडीत आल्यास फायदाच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, प्रकाश आंबेडकरांसोबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती
मुंबई : बेटिंगचा डॉन पप्पू उर्फ प्रकाश सावळा तडीपार घोषित, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, पोलीस उपायुक्त संग्राम सिंह यांच्याकडून तडीपारीची कारवाई
युतीबाबत संभ्रम कायम असल्याने भाजप खासदारांचा चिंतेचा सूर, युती न झाल्यास मत विभाजन टाळण्यासाठी आढावा बैठकीत खलबतं, भाजपचा लोकसभा मतदारसंघनिहाय आढाव्याचा सलग दुसरा दिवस, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, रावेर, नंदुरबार, दिंडोरी, नाशिक आणि शिर्डी या मतदारसंघांवर चर्चा
शंकराचार्य 21 फेब्रुवारीला अयोध्येत जाणार, राम मंदिरासाठी न्यासपूजन करणार, धर्म संसदेत प्रस्ताव मंजूर
बदलापूर : बारवी डॅम परिसरात कॉलेज विद्यार्थ्यांच्या कारला अपघात, गाडी उलटून तरुण आणि तरुणीचा मृत्यू, तर पाच विद्यार्थी जखमी
लोकांची इच्छा असली तरी युतीबाबतचा निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
लोकांची इच्छा असली तरी युतीबाबतचा निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
मुंबई : वर्षा बंगल्यावर भाजपची लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आढावा बैठक, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, जयकुमार रावल, गिरीश महाजन बैठकीला उपस्थित, आज खान्देश आणि मराठवाड्याच्या विभागवार बैठका होणार

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचीही मोर्चेबांधणी : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपपाठोपाठ शिवसेनेचीही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विभागवार पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार आहे. प्रत्येक मतदारसंघाचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. तसंच विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांचीही चर्चा बैठकीत होणार आहे.
मुंबई : गिरगावमध्ये कुंभारवाडा गल्लीतील रहिवाशी इमारतीला आग, स्फोटाचेही आवाज
मुंबई : गिरगावमध्ये कुंभारवाडा गल्लीतील रहिवाशी इमारतीला आग, स्फोटाचेही आवाज
नवी दिल्ली : मोदी सरकार 1 फेब्रुवारीला अंतरिम नाही, पूर्ण अर्थसंकल्प मांडणार : सूत्र
नवी दिल्ली : मोदी सरकार 1 फेब्रुवारीला अंतरिम नाही, पूर्ण अर्थसंकल्प मांडणार : सूत्र
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा राळेगणसिद्धीचा दौरा रद्द, अण्णा हजारेंच्या ठाम भूमिकेनंतर महाजन यांचा निर्णय, अण्णा हजारे बेमुदत उपोषणावर ठाम
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा राळेगणसिद्धीचा दौरा रद्द, अण्णा हजारेंच्या ठाम भूमिकेनंतर महाजन यांचा निर्णय, अण्णा हजारे बेमुदत उपोषणावर ठाम
उल्हासनगर : गायकवाड पाडा परिसरात चार ते पाच जणांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, विलास गायकवाड, राम गायकवाड, रोहित मोरे, उषा गायकवाड जखमी, सर्व जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु, हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट

पुणे : येरवड्यातील प्रायडलनगर सोसायटीमध्ये 21 कुत्रे आणि मांजरांना विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 14 मांजरी आणि 7 कुत्र्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात हा प्रकार घडल्याचं स्थनिकांनी सांगितलं.

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत,
दादर आणि परेल स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने ठाण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत, तर भायखळा ते माटुंगा स्टेशनदरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवली

यवतमाळमध्ये सलग दोन दिवस कमी तापमानाची नोंद, तापमान 6.4 अंश सेल्सिअसवर
परभणीत पुन्हा थंडीची लाट, तापमान 4 अंशावर, कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला
परभणीत पुन्हा थंडीची लाट, तापमान 4 अंशावर, कडाक्याच्या थंडीने जिल्हा गारठला
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे 31 जानेवारीला दोन तास बंद राहणार, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेल हद्दीत गँट्री बसवण्याच्या कामामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद राहणार, पुण्याकडे जाणारी वाहतूक कळंबोली बायपास रोडमार्गे वळवण्यात येणार

बैकग्राउंड

1. मराठा अशी कोणतीही स्वतंत्र जात नाही, आरक्षणासाठी मराठा समाज पात्र, राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्वाळा

2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बळीराजाला मदतीचा हात, महाराष्ट्राला 4 हजार 714 कोटींचा निधी, इतर दुष्काळग्रस्त राज्यांनाही मदत

3. भाजपच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठका, युतीवर कुठलीच चर्चा नाही, मात्र बैठकीत युती होईल अशी अपक्षा व्यक्त

4. लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे हातमिळवणी करण्याची शक्यता, राष्ट्रावादी मनसेला दोन जागा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा

5. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस, सत्तेत आल्यास किमान वेतनानंतर आता महिलांना आरक्षण देण्याची राहुल गांधींची घोषणा

6. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची आज 71 वी पुण्यतिथी, अभिवादनासाठी नेतेमंडळी राजघाटावर, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.