LIVE BLOG | पाकिस्तानी वस्तूंवर आता थेट 200 टक्के आयातशुल्क, अर्थमंत्र्यांची घोषणा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 16 Feb 2019 11:29 PM


वर्ध्यात आर्वीलगतच्या पिपरी पुनर्वसन येथे महिलेची निर्घृण हत्या, बेबीताई मेंढे मृतक महिलेचं नाव, मूळची अमरावती जिल्ह्यातील कवडघाट येथील रहिवासी
पुलवामात वापरलेल्या 200 किलो स्फोटकांचा बदला 200 टक्के आयात शुल्कांनी, पाकिस्तानी वस्तूंवर आता थेट 200 टक्के आयातशुल्क, अर्थमंत्र्यांची घोषणा
उरण तालुक्यातील दिघोडे येथे भीषण आग, दिघोडे येथील गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
वरोरा शहरातील आनंदवन चौकात भीषण अपघात,
दुचाकीवरील मायलेकीचा मृत्यू,
वडील गंभीर जखमी, कोळसा भरलेल्या ट्रकने दिली दुचाकीला धडक
पंढरपुरात विठ्ठल दर्शन रांगेतील डीपी जळाला, भाविकांत भीतीचे वातावरण, वीज पुरवठा खंडीत, माघी एकादशीसाठी मोठी गर्दी
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मराठवाड्यातील आणखी 4 उमेदवार घोषित,

औरंगाबाद-बी जी कोळसे पाटील,
बीड- प्रा विष्णू जाधव,
उस्मानाबाद- अर्जुन सलगर,
जालना- डॉ शरद वानखेडे
खोपोली बाजारपेठेतील लोहाना समाज हॉलमध्ये आग, हॉलच्या इलेक्ट्रीक मीटर बोर्डला आग, शॉर्टसर्किटमुळे लागली आग

अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने आग अटोक्यात ...
काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये आयडीचा स्फोट, एलओसीवर तपासणी दरम्यान स्फोट
शिर्डी : निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव आणि शिर्डीला पाईपलाईनने देण्यास विरोध, निळवंडे लाभधारक शेतकरी आक्रमक, स्नेहलता कोल्हेंविरोधात जोरदार घोषणाबाजी
रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी उद्या चर्चा करण्याचं आश्वासन,
आजची परीक्षा पुढे ढकलली, नाशिक पोलिसांनी केली मध्यस्थी
नागपूर : विदर्भाने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफी जिंकली, शेष भारताला पहिल्या डावाच्या आघाडीच्या आधारावर हरवले, रणजी चषक जिंकल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या महत्वाच्या चषकावर नाव कोरले


चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पदमापूर येथे वाघाच्या हल्ल्यात अनीता मोरेश्वर गेडाम या 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, गावाजवळील जंगलात वाघाचने केला हल्ला












पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, दोन जाहीर सभांनाही संबोधित करणार
मुंबई : विक्रोळीच्या गांधीनगर पुलावर कारचा अपघात, चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्यानं कार डिवायरला आदळली, अपघातामुळे वाहतूक धीम्या गतीने, अपघातात तीन जण गंभीर जखमी
शिवसेना-भाजपच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, लोकसभेसाठी 23-25 तर विधानसभेसाठी 144-144 चा फॉर्म्युला, शिवसेनेसाठी भाजप पालघरची जागा सोडणार, येत्या दोन ते तीन दिवसांत अमित शहा मातोश्रीवर येण्याची शक्यता

बैकग्राउंड

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन, दोन जाहीर सभांनाही संबोधित करणार

2. भारतमातेच्या वीरपुत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राहुल गांधी आणि लष्करी अधिकाऱ्यांची आदरांजली, हल्ल्याचा बदला घेण्याचा मोदींचा गर्भित इशारा

3. पुलवामा हल्ल्यात बुलडाण्याचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत, दोन्ही जवानांवर आज मूळगावी अंत्यसंस्कार

4. काश्मीरमधील हुर्रियत नेत्यांची सुरक्षा काढली जाणार, गृहमंत्री राजनाथ सिंहांचे संकेत, नवी दिल्लीत आज तातडीची सर्वपक्षीय बैठक

5. पाकचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढण्याचा भारताचा निर्णय, पाकच्या उच्चायुक्तांना विचारला जाब तर पाकमधल्या भारतीय उच्चायुक्तांनाही सरकारचं चर्चेसाठी निमंत्रण

6. अमेरिकेकडून हल्ल्याचा निषेध तर चीनची दुतोंड़ी भूमिका, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय अतिरेकी घोषित करण्याला चीनची आडकाठी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.