आज दिवसभरात... 24 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 24 Jan 2019 08:23 PM
मुंबई : दक्षिण मध्य मुंबईतील जागेवरुन मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात गोंधळ,
एकनाथ गायकवाड यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचीच घोषणाबाजी, गायकवाडांशिवाय कोणालाही तिकीट द्या, कार्यकर्ते आक्रमक, भालचंद्र मुणगेकरही या जागेसाठी इच्छुक
सातारा | महाबळेश्वरमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृत्यू, लॉडविक पॉईंटवरील घटना, उपचारांदरम्यान विनोद जाधव यांनी प्राण गमावले
लान्सनायक नाझीर वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार, शोपियांमध्ये अतिरेक्यांसोबत लढताना नाझीर वाणी यांना वीरमरण, देशातील सर्वात मोठा शौर्य पुरस्कार मिळवणारे नाझीर वाणी पहिले काश्मिरी जवान, 26 जानेवारीला सर्वोच्च पुरस्काराचं वितरण
व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल, सीबीआयचे नरिमन पॉईंट, बीकेसीसह मुंबईतील चार ठिकाणी छापे, व्हिडीओकॉन, सुप्रीम एनर्जीच्या कार्यालयांवर छापा
आगामी निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे नाही तर ईव्हीएमद्वारेच मतदान होणार, निवडणूक आयोगाची ठाम भूमिका
बीड : सेप्टिक टँक उचलताना टँकमध्ये पाच जण अडकले, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु
बीड : सेप्टिक टँक उचलताना टँकमध्ये पाच जण अडकले, दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु
मेळघाटात वनविभाग आणि पोलिसांवर दगडफेक प्रकरण : मेळघाटच्या वनविभाग आणि आकोट पोलिसांवर दगडफेक प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्य वनरक्षक व वनपाल संघटनेने निषेध व्यक्त केला असून बेमुदत संपाचा इशाराही दिला. हल्ला करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा संघटनेने प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना एका निवेदनातून दिला आहे. तसंच द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असोसिएशननेही कारवाईची मागणी केली आहे.

धुक्यामुळे मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक मंदावली : सध्या तळकोकणात मोठ्या प्रमाणात धुकं पडत आहे. या धुक्यामुळे काही मीटर अंतरावरचे दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम जोरात सुरु असल्याने ठिकठिकाणी महामार्गावर महामार्ग परिवर्तित केला जातो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे महामार्ग पोलीस वाहन चालकाना वाहने सावकाश चालवण्याची सूचना देण्यात आहेत.

पुण्यात आज पाणी पुरवठा बंद : पुणे शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगितलं असलं तरी तो का बंद यासंदर्भात कोणतंही कारण दिलेलं नाही, मागच्या दाराने लागू केलेली ही पाणीकपात आहे. मागील गुरुवारीही पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी पालिकेकडून दुरुस्तीचं कारण सांगण्यात आलं होतं. मात्र आज पाणी कपातीसंदर्भात कोणतंही कारण सांगण्यात आलेलं नाही. शिवाय उद्याही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बैकग्राउंड

1. लवकरच शिवसेना-भाजपच्या युतीबाबत चर्चांना सुरुवात, सूत्रांची माहिती, भाजपच्या राज्य कार्यकारिणीआधी जागावाटपाच्या हालचालींना वेग

2. ठाकरे सिनेमाच्या स्क्रिनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजित पानसेंचा काढता पाय, जागा न मिळाल्यानं नाराजी, राऊतांसोबत खडाजंगीची चर्चा

3. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचं ब्रह्मास्त्र, प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी तर काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष, मोदींचा प्रियंकांवर निशाणा

4. मुंब्रा, औरंगाबादेतून अटकेतल्या आरोपींचा कुंभमेळ्यात घातपाताचा कट, एटीएसची औरंगाबाद न्यायालयात माहिती, आरोपींकडून घातक केमिकल जप्त

5. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा पदभार, हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता, जेटलींवर न्यूयॉर्कमध्ये शस्त्रक्रिया

6. देशातील बेरोजगारांसांठी खूशखबर, रेल्वेमध्ये लवकरच ४ लाख कर्मचाऱ्यांसाठी भरती होणार, रेल्वेमंत्री पियुष गोयलांची मोठी घोषणा

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.