आज दिवसभरात... 5 फेब्रुवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 05 Feb 2019 02:24 PM
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिंदे संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
पुणे : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इंदापुरात विमान कोसळलं, दुर्घटनेत शिकाऊ पायलट जखमी
पुणे : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इंदापुरात विमान कोसळलं, दुर्घटनेत शिकाऊ पायलट जखमी
काँग्रेस मुख्यालयात प्रियांका गांधींच्या नावाची पाटी लागली - नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांच्या नावाची पाटी काँग्रेस मुख्यालयामध्ये लागली. राहुल गांधी उपाध्यक्ष असताना त्यांच्यासाठी जो कक्ष होता तोच प्रियांका गांधी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महासचिव असल्या तरी त्या इतर महासचिव यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत हे स्पष्ट होतं. राहुल गांधी यांच्या अगदी शेजारचा कक्ष प्रियांकाचा आहे. केवळ गांधी नाहीतर प्रियांका यांच्या नावापुढे 'वाड्रा' लिहिलं आहे हेही विशेष
मुंबई : प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा,

प्रा. तेलतुंबडेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला राज्य सरकारचा जोरदार विरोध, उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितली, 11 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी

मुंबई : कर्जबुडव्या विजय मल्ल्या प्रकरणी विशेष कोर्टात 13 मार्चला पुढील सुनावणी, मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याच्या एसबीआयच्या याचिकेवर सुनावणी, ईडीकडून आज उत्तर सादर, तर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी उत्तर देण्यासाठी 5 मार्चची मुदत

राळेगणसिद्धी : अण्णा हजारेंचं वजन साडेपाच किलोने वजन घटलं, युरिन किटोन 3 पेक्षा अधिक, मूत्रपिंड आणि मेंदूला त्रास होण्याची शक्यता, उपोषण थांबवण्याचा डॉक्टर धनंजय पोटे यांचा सल्ला
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित रामटेक दौरा रद्द, राळेगणसिद्धीला जाऊन उपोषणकर्त्या अण्णा हजारेंची भेट घेण्याची शक्यता
कोलकाता : पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी धरणा आंदोलनस्थळी येऊन ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी दोघांमध्ये चर्चा
अहमदनगर : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंना भेटण्याची शक्यता
अहमदनगर : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंना भेटण्याची शक्यता
काँग्रेस विधीमंडळ सदस्य आणि काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची 9 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये बैठक, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी बैठक बोलावली

बैकग्राउंड

1. ममता बॅनर्जींच्या समर्थनात दिल्लीत विरोधक एकवटले, शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक, तर जीव देईन पण तडजोड करणार नाही, ममतांचा सरकारला इशारा

2. पंतप्रधान कार्यालयातील तज्ज्ञ मंडळींनी चर्चेला यावं, अण्णा हजारेंचं सरकारला आवाहन, भामरे आणि महाजनांसोबतची चर्चा निष्फळ

3. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्याच्या जीव घेईन, बीडमध्ये पंकजा मुंडेंचं विधान, जयंत पाटलांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र

4. संसदेचं अधिवेशन सुरु असताना शिवसेना खासदारांना मातोश्रीवर बोलावणं, आज दोन महत्त्वाच्या बैठका तर युतीसाठी 25-23 चा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती

5. कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारची परवानगी, मल्ल्याला अपीलासाठी 14 दिवसांची मुदत, भारत सरकारला मोठं यश

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.