आज दिवसभरात... 10 फेब्रुवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 10 Feb 2019 11:33 PM
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु केम्ब्रिजला गेले आणि तिथं फेल झाले. नेहरु घराण्यात कुणी कॉलेज केलं नाही, भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची वादग्रस्त टीका


मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट, नांदेडमध्ये आठ वर्षाच्या मुलाने हात गमावला, बनावटी कंपनीचा स्वस्त मोबाईल पडला महाग
राजस्थानमधील गुर्जर समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी धोलपूरमध्ये दगडफेक आणि गोळीबार केला आहे. तसेच तीन गाड्यांची जाळपोळही केली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना : भारतानं टी-20 मालिका गमावली, अटीतटीच्या लढतीत भारताचा 5 धावांनी पराभव
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं सरकार विरोधातील भाषण थांबवणं म्हणजेच देशात अघोषित आणीबाणी असल्याचे सिद्ध होतं, मोदी सरकार आपल्या विरोधातील कोणतीच गोष्ट खपवून घेत नाही : नवाब मलिक

कल्याण : मलंगगडसह तीन डोंगरांना लागली आग, अद्याप कुठलीही शासकीय यंत्रणा घटनास्थळी नाही, कुशिवलीला लागून असलेल्या डोंगरावर ससे, कोल्हे, बिबटे यांचंही वास्तव्य
अहमदनगर : विविध प्राणी पक्षांचे हुबेहूब आवाज काढणारे ठकाबाबा गांगड यांच वृद्धापकाळाने निधन, अकोले तालुक्यातील उडदावणे या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार
सोलापूर : उळे गावात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळाबारात दरोडेखोर ठार, दरोडेखोरांच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक विजय पाटील गंभीर जखमी
सरकारविरोधात बोलल्याने अमोल पालेकरांचं भाषण रोखलं, मुंबईतील एनजीएमतर्फे अमोल पालेकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होते
हार्बर मागर्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत लोकलसेवा बंद, चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा सकाळी 11.10 वाजेपासून दुपारी 3.40 पर्यंत बंद
परभणी सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट, आज 6.3 तापमानाची नोंद, गार वाऱ्यामुळे थंडीत प्रचंड वाढ
महाबळेश्वरमध्ये बर्फाची चादर, वेण्यालेक परिसरतील तापमान 0 अंश सेल्सियस, महाबळेश्वरमधील तापमान 5 अंशावर तर वाईमधील तापमान 6 अंशावर
सरकारविरोधात बोलल्याने अमोल पालेकरांचं भाषण रोखलं, मुंबईतील एनजीएमतर्फे अमोल पालेकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होते
कल्याण आणि टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या कामाकरिता मेगाब्ल़ॉक, काही एक्स्प्रेस गाड्या रद्द

बैकग्राउंड

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव येत असल्यानं काळजी वाटते, सांगोल्यात शरद पवारांचं वक्तव्य, चंद्रकांत पाटलांवरही टोलेबाजी
2. महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंका, पुण्यातील आढावा बैठकीत अमित शाहांचे कार्यकर्त्यांना आदेश, बारामतीची जागा जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांनाही विश्वास
3.अण्णा हजारेंचं आजपासून मौनव्रत आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही केंद्राकडून लेखी अहवाल नसल्यानं अण्णांचा निर्णय

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.