LIVE UPDATE | आज दिवसभरात... 11 फेब्रुवारी 2019
आजच्या दिवसभरात घडणाऱ्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
11 Feb 2019 10:23 PM
खासदार राजू शेट्टी महाआघाडीत जाणार नाही, जागावाटपावर तोडगा न निघाल्याने भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटना नऊ जागा लढवण्याच्या तयारीत
नवी दिली : प्रसिद्ध दिवंगत गायक भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांचा भारतरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार, पूर्वोत्तर भारतासाठीचं प्रस्तावित नागरिकता संशोधन विधेयक-2016 मुळे 'भारतरत्न'वर बहिष्कार, भूपेन हजारिका यांचा मुलगा तेज हजारिकांची भूमिका
मुख्यमंत्र्यांच निवासस्थान वर्षा बंगल्याशेजारील ज्ञानेश्वर बंगल्याला आग, अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी उपस्थित, आग विझवण्याचं काम सुरु
मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव मारुती डिझायर कारची अल्टो कारला धडक, अपघातात एकाचा मृत्यू, चार जण जखमी, खेड तालुक्यातील उधळे गावाजवळील घटना
अकोला : शिक्षक गजानन इंगळे यांची शाळेतच विष प्राशन करुन आत्महत्या, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयातील प्रकार, मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप
#मुंबई : हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद, रे रोड स्थानकादरम्यान बिघाड झाल्याने प्रवाशांचा खोळंबा
#BREAKING #मुंबई : हार्बर लाईनवरील वाहतूक ठप्प, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद
नाशिक शहरातील शेतीवरील कर हटविला, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची माहिती, नाशिककरांना मात्र करवाढीपासून दिलासा नाही, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लादलेली करवाढ कायम राहणार
मुंबईत मराठी भाषिकांच्या तुलनेत हिंदी भाषिक टक्का वाढला, आयआयपीएसच्या अहवालातून धक्कादायक माहिती उजेडात, शिवसेना, मनसेच्या डोळ्यात अंजन घालणारी बाब समोर
पुण्याचे भाजप खासदार संजय काकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला, संजय काकडे सध्या भाजपचे राज्यसभा खासदार, काकडे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक
कोल्हापूर : शिवसेना, हिंदू धर्म यांच्याविरोधात अपशब्द काढला तर ओवेसी यांना कोल्हापूरच्या बाहेर जाऊ देणार नाही, शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवलेंचा असदुद्दीन ओवेसींना इशारा, उद्या कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीचा कार्यक्रम
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लखनौमध्ये दाखल, थोड्याच वेळात रोड शोला सुरुवात करणार, राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही लखनौमध्ये, विमानतळाबाहेर स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लखनौमध्ये दाखल, थोड्याच वेळात रोड शोला सुरुवात करणार, राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही लखनौमध्ये, विमानतळाबाहेर स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लखनौमध्ये दाखल, थोड्याच वेळात रोड शोला सुरुवात करणार, राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही लखनौमध्ये, विमानतळाबाहेर स्वागताला काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
पुणे : कर्वेनगरमध्ये समोसे तयार करण्याच्या कारखान्यात सिलेंडरचा भडका, चार जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, जखमी ससून रुग्णालयात दाखल
आंध्र प्रदेशला विशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू यांचं दिल्लीत उपोषण, काँग्रेसचाही उपोषणाला पाठिंबा, राहुल गांधी नायडूंच्या भेटीला
मुंबई : राज ठाकरेंचं निवासस्थान 'कृष्णकुंज'वर 11 वाजता मनसेचे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, महागठबंधनमध्ये स्थान न मिळाल्यास पुढील वाटचालीवर चर्चा होणार
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने, कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक रखडली, देवगिरी एक्स्प्रेस टिटवाळा स्थानकात थांबून
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन कार एकमेकांवर धडकून अपघात, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर भाताणजवळ अपघात, जखमी महिला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल
नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडीत तरुणाची हत्या, दोन दिवसात हत्येची दुसरी घटना, गजानन गावित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती
बैकग्राउंड
1. अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण रोखल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु, बदलांवर बोलणं औचित्यभंग कसा, पालेकरांचा सवाल, तर हेच का अच्छे दिन, काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांची टीका
2. फेसबुक, व्हॉट्सअपनंतर आता ट्विटरलाही मोदी सरकारची तंबी, ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश, समाजमाध्यमांवर कडक प्रतिबंध लावण्याचे प्रयत्न
3. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर, लखनौमध्ये काँग्रेसकडून पोस्टरबाजी आणि शक्तीप्रदर्शन
4. सोलापुरात पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, हल्ल्यात पोलिस निरीक्षक जखमी, गोळीबारात विनायक काळेचा मृत्यू, तर चकमक बनावट असल्याचा कुटुंबीयांचा आरोप
5. भिवंडीत 2005 साली झालेल्या दंगलीतील एका आरोपीला 12 वर्षांनंतर अटक, निजामपुरा पोलिसांना मोठं यश
6. मुंबईतल्या रस्त्यांवर धावल्या 400 विंटेज कार, वांद्रे ते बेलार्ड पिअरपर्यंत 1885 सालापासूनच्या विंटेज कार्सची रॅली