LIVE UPDATE | आज दिवसभरात... 6 फेब्रुवारी 2019

ABP News Bureau Last Updated: 06 Feb 2019 10:16 PM
पाच तासांनंतर रॉबर्ट वाड्रांची चौकशी संपली. पैशांच्या अफरातफरप्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर 36 प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित, नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांचा सन्मान
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं तैलचित्र लागणार, 12 फेब्रुवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत सोहळा
शक्ती मिल प्रकरणी राज्य सरकारला आणखी मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं
डोंबिवलीत लोकलच्या गर्दीचा तिसरा बळी, 20 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू
औरंगाबाद : देशातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये होणाऱ्या महाप्रसादांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न, संशयित दहशतवाद्यांची कबुली, ठाण्यातल्या मुंब्रा आणि औरंगाबादमधून अटक केलेल्या 9 संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
मुंबई : अंधेरीतील मरोल नाका पाईपलाईन परिसरात दोन मजली इमारत कोसळली, मुकुंद हॉस्पिटल जवळील घटना, खोदकाम सुरु असताना मशीनचा हादरा बसून इमारत कोसळल्याचा स्थानिकांचा दावा
सरकारकडून आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांब्यात कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन, तिसऱ्या दिवशी आंदोलक मुलींचं वजन दोन किलोंनी घटलं
औरंगाबाद : दोन पोलीस कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी, घरगुती कारणावरून मारहाण, पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल, दोन पोलीस कॉन्स्टेबलसह 10 जणांच्या विरोधात गुन्हा
दिल्ली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवी दिल्लीत स्वामिनाथन आयोग लागू होणार, स्वामिनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य
पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 80 धावांनी विजय, भारताचा डाव 139 धावांमध्ये आटोपला
कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात आरोपपत्र, एसआयटीची मुंबई उच्च न्यायालयात माहिती, पश्चिम बंगालमध्ये सीबीआयसोबत प्रसंगावरून हायकोर्टाची नाराजी
मुंबई : कोस्टल रोडच्या कामासाठी वरळीतील कोळी बांधवांना मासेमारीला मज्जाव, मासेमारी न करण्यास सांगत बोटी हटवल्याने कोळी बांधव आक्रमक, एचसीसी आणि एल अँन्ड टी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून कोस्टल रोडचं सर्वेक्षण, मात्र मच्छिमारांनी बोटीतूनच काळे झेंडे दाखवले
शेतकरी पेन्शन योजनेसाठी जिल्हा प्रशासन कामाला, उद्यापासून 15 फेब्रुवारीपर्यंत विशेष कॅम्प राबवणार, 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान हरकती स्वीकारणार, 20 फेब्रुवारीनंतर अहवाल केंद्राला पाठवणार, जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
मराठा आरक्षणावरील याचिकेवर युक्तिवादाला सुरुवात, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांपैकी जयश्री पाटील यांच्या वतीने अॅड. सदावर्तेंचा युक्तिवाद सुरु
पश्चिम बंगालमध्ये सीबीआयसोबत घडलेल्या नाट्यावर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी, देशातील सर्वोच्च तपासयंत्रणेने आपली पत स्वत: सांभाळायला हवी, हायकोर्टाचं मत, केवळ आशियातील शेजारी राष्ट्रांचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं भारतातील घडामोडींवर लक्ष असतं, हायकोर्टाने सुनावलं
#IndVsNZ : वेलिंग्टनमधील पहिला टी20 सामना, नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
डॉ. नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्याकांडातील तपासाचा प्रगती अहवाल हायकोर्टात सादर, कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार, एसआयटीची हायकोर्टात माहिती
सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त नागपूरच्या अवंती रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, कामानिमित्त नागपूरला आले असताना प्रकृती बिघडली होती
महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेय हिला अटक, नोएडा सेक्टर 14 A मध्ये अलीगढ पोलिसांची कारवाई
रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांच्या हाती भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रवी पाटील यांचा भाजप प्रवेश
रायगड जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील यांच्या हाती भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रवी पाटील यांचा भाजप प्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मातोश्रीवर आज बैठक, शिवसेना खासदार विनायक राऊत, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, राजन साळवी, उदय सामंत यांच्यासह नाणार कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालाम , नाणार ग्रामस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

बैकग्राउंड

1. मराठा आरक्षणावरील याचिकांवर आजपासून हायकोर्टात अंतिम सुनावणी, मुकुल रोहतगी सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणार

2. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वढेरा ईडीसमोर हजेरी लावणार, तर सलग दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधींची यूपीतल्या नेत्यांसोबत खलबतं

3. सात दिवसांनंतर अण्णा हजारेंचं उपोषण मागे, सहा तासांच्या दीर्घ चर्चेनंतर मागण्या पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अण्णांना आश्वासन

4. दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदतनिधीचा पहिला हप्ता वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचे आदेश

5. मोदींच्या चाणक्याकडे शिवसेनेच्या प्रचाराची धुरा, काही जागांसाठी युतीचं घोगडं कशाला भिजवत ठेवता, प्रशांत किशोर यांचा सवाल

6. भारत-न्यूझीलंडदरम्यान टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात, ऐतिहासिक वनडे विजयानंतर भारत टी-20 मैदानही गाजवण्याच्या तयारीत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.