लखनौमध्ये प्रियांका गांधी, राहुल गांधींचा रोड शो
प्रियांका गांधी पाच दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी, पश्चिम उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी ज्योतिरादित्य शिंदेही असतील. 15 फेब्रुवारीला प्रियांका दिल्लीला परततील, तर राहुल गांधी आजच परतणार आहेत.
राहुल गांधी, प्रियांका गाधींचा रोड शोने दोन किमी अंतर पार केलं
राहुल गांधी, प्रियांका गाधींचा रोड शोने दोन किमी अंतर पार केलं
बैकग्राउंड
लखनौ : राजकारणात 'फुलटाईम' प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी आज आगामी निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. प्रियांका गांधी काँग्रेस अध्यक्ष आणि बंधू राहुल गांधी यांच्यासोबत लखनौमध्ये रोड शो करुन शक्तिप्रदर्शन करतील.
प्रियांका गांधी पाच दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी, पश्चिम उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी ज्योतिरादित्य शिंदेही असतील. 15 फेब्रुवारीला प्रियांका दिल्लीला परततील, तर राहुल गांधी आजच परतणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्व 80 जागांचा आढावा घेणार आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी जनतेला एक ऑडिओ मेसेजही दिला आहे. 'मी प्रियांका गांधी-वाड्रा. तुमच्या भेटीसाठी लखनौमध्ये येत आहे. आपण सर्व जण मिळून एका नव्या राजकारणाला सुरुवात करुयात. यामध्ये आपण सर्व जण भागीदार असाल. माझे युवा मित्र, भगिनी, दुबळे घटक अशा सर्वांचे आवाज कणखर असतील. माझ्यासोबत नव्या भविष्याचा आरंभ करुयात' असं आवाहन त्यांनी केलं आहे.
कसा असेल रोड शो?
प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीहून विमानाने सकाळी 9.30 वाजता रवाना
सकाळी 10. 40 वाजता लखनौ विमानतळावर आगमन
सकाळी 11. 05 वाजता लखनौ विमानतळावरुन रोडशोला सुरुवात
एका बसमधून 15 किलोमीटर रोड शो करणार. साधारण चार तासांनी म्हणजेच दुपारी तीन वाजताच्या सुमारास उत्तर प्रदेश काँग्रेस कार्यालयात रोडशो समाप्त होणार
दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रियांका, राहुल आणि ज्योतिरादित्य हे प्रदेश काँग्रेस कार्यालयात संपूर्ण उत्तर प्रदेशातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -