आज दिवसभरात... 2 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 02 Jan 2019 10:44 PM
कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षक सचिन पाटील निलंबित ; आरोपी संतोष पोळला मोबाईल पुरवल्याचा आरोप
कोल्हापूर : कळंबा कारागृह अधीक्षक सचिन पाटील निलंबित ; आरोपी संतोष पोळला मोबाईल पुरवल्याचा आरोप
'भारतरत्न' घडवणारा 'भीष्माचार्य' गेला! सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन
नवी दिल्ली : भाजप खासदारांच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांची स्वतंत्र बैठक होणार, राणेंच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांची बैठक होणार, खासदार नारायण राणेही राहणार उपस्थित
नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातील खासदारांची आज दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात बैठक बोलावली, संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान खासदारांची बैठक
2019 ची रणनीती, महाराष्ट्रात युतीतल्या बेबनावाची चर्चा या पार्श्वभूमीवर बैठक
पालघर : वाडा तालुक्यातील मुसारने इथल्या सेंट गोबेन जिप्सन कंपनीत भिंत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. राजेश सदानंद पाटील असं मृत कामगाराचे नाव आहे. कंपनीतील भिंतीला जेसीबीचा धक्का लागल्याने भिंत अंगावर कोसळली आणि या कामगाराचा डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
नवी दिल्ली : राफेल घोटाळ्याप्रकरणी यशवंत सिन्हा, अरुण शौरी, प्रशांत भूषण यांची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका, 14 डिसेंबरच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी
मुंबई : खेळेल महाराष्ट्र तर जिंकेल राष्ट्र, खेलो इंडियासाठी नवं ब्रीदवाक्य, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खेलो इंडिया अॅपचं उद्धाटन, स्पर्धा, आसन व्यवस्था अशा प्रकारची माहिती अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार, बाहेरुन येणाऱ्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना अॅपमुळे मदत होणार
नवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावर आज लोकसभेत चर्चा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही बोलणार, तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण चर्चेला उत्तर देणार
माटुंगा ते मुलुंडपर्यंत सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर धावणार असून पुढील काही वेळ हा बदल राहिल, अशी घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. सायन आणि कुर्ला तसंच ठाणे आणि मुलुंड दरम्यान महत्त्वाचं काम सुरु असल्याने बदल केले आहेत. परिणामी कल्याण आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्वच धीम्या आणि जलद गाड्या उशिराने धावत आहेत.
मुंबई : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, ठाणे आणि मुलुंड स्टेशनदरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडे, वाहतूक उशिराने, काही गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या
मुंबई : सायन स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणच्या दिशेला जाणारी जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवली आहे. यामुळे उद्यान एक्सप्रेस दादर स्थानकात थांबवण्यात आली आहे. तसं कर्जतला जाणाऱ्या जलद गाड्या धीम्या मार्गावर धावणार आहेत. तर कर्जतवरुन सीएसएमटीकडे येणारी लोकल नेरुळच्या स्टेशनजवळ थांबली आहे.
बुलडाणा : देऊळगाव राजा इथे वीस दिवसाआड पाणी पुरवठा, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सायन रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड, सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
अंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला, पोलीस आणि ट्रेकर्स घटनास्थळी रवाना, ट्रकमध्ये चालकासह सहप्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती
अंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला, पोलीस आणि ट्रेकर्स घटनास्थळी रवाना, ट्रकमध्ये चालकासह सहप्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती
परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी थंडीचा कडाका कायम, आजचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस
परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी थंडीचा कडाका कायम, आजचं तापमान 5.5 अंश सेल्सिअस
तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होणार?

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. मात्र काँग्रेसने हे विधेयक राज्यसभेत सहमत न होऊ देण्याचा पवित्रा घेतला आहे. आकड्यांचा जर विचार केला तर एनडीएकडे राज्यसभेत 93 खासदार तर आघाडीकडे 112 खासदार आहेत. अण्णाद्रमुक 13, बीजद 9, टीआरएस 6 आणि वायएसआर कॉग्रेसच्या 2 सदस्यांच्या समर्थना शिवाय हे विधेयक सहमत करुन घेणं सरकारला अवघड जाणार आहे. तर लोकसभेत राफेलवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक होताना दिसतील.

बैकग्राउंड

शेतात आणि हॉटेलमध्येही शेकोटी
लातूरमध्ये शेकोटी पेटवून हॉटेलचा कारभार सुरु आहे. एरव्ही दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा प्रकोप सुरु आहे.ग्राहक टिकवण्यासाठी हॉटेल मालकांनी लातुरात कधी लढवली नव्हती तशी शक्कल लढवली आहे. लातूरमधील अजय ठक्कर यांच्या अरोमा हॉटेलच्या प्रांगणात असलेल्या गार्डनमध्ये संध्याकाळी सहा वाजले की ग्राहकांसाठी प्रत्येक टेबलजवळ एक शेकोटी पेटवली जाते. त्या पेटवलेल्या शेकोटीमध्ये लाकडे टाकून त्यावर दर मिनिटाला रॉकेलचा शिडकावा करुन हॉटेलचे  वेटर शेकोटीला जाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. रात्री उशिरापर्यंत या हॉटेलमधले चित्र असतं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.