आज दिवसभरात... 7 फेब्रुवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau
Last Updated:
07 Feb 2019 11:46 PM
बेस्ट कामगारांच्या संपानंतर आता मुंबई महापालिका कामगार संघटनाही संपावर जायच्या तयारीत
जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या. 99 टक्के वस्तूंवर 18 टक्यांपेक्षा कमी जीएसटी आहे : नरेंद्र मोदी
दुधावर कर लावणाऱ्या काँग्रेसने जीएसटीबाबत बोलू नये. जीएसटीमुळे अत्यावश्यक वस्तू करांच्या बाहेर गेल्या आहेत : नरेंद्र मोदी
जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं तेव्हा महागाई होती.परंतु गेल्या साडेचार वर्षांपासून महागाईचा दर केवळ 4 टक्के आहे. मध्यमवर्गीयांना आमच्या सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला : नरेंद्र मोदी
काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरनामा प्रसिद्ध करत आलं आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली : नरेंद्र मोदी
जब कभी झूठ की बस्ती में सच को तडपते देखा है तब मैने अपने भीतर किसी बच्चे को सिसकते देखा है. माझी अवस्था सध्या या कवितेसारखी झाली आहे : नरेंद्र मोदी
काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत, 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले : नरेंद्र मोदी
काँग्रेसच्या कार्यकाळात संरक्षण खात्याशी संबधित एकही व्यवहार दलालीशिवाय झालाच नाही, काँग्रेसने आपल्या जवानांना कमजोर केलं : नरेंद्र मोदी
भारत आता जगातला चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर झाला आहे. हे मेक इन इंडियाचं यश आहे : नरेंद्र मोदी
मेक इन इंडियामुळे जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट भारतात उपलब्ध आहे, इंटरनेटचा सर्वाधिक वापर भारतात केला जात आहे : नरेंद्र मोदी
काँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, काँग्रेसकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते : नरेंद्र मोदी
आम्ही जगाला मेक इन इंडियाची ताकद दाखवली, भारत हा जगातला दुसरा सर्वात मोठा स्टील प्रोड्यूसर झाला आहे : नरेंद्र मोदी
आगामी निवडणुकासांठी सर्व विरोधकांना शुभेच्छा, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचं स्वागत : नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवडणुकीपूर्वी लोकसभेतलं शेवटचं भाषण
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांमध्ये मागील तीन महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत आहेत. आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भूकंपामुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी करून या संदर्भातली माहिती घेतली.
राज्य सरकार नागरिकांना पुरेशा शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलंय - अॅड. अणे
मराठा जर मागास वर्गातील ओबीसी समाजाचा भाग आहेत तर त्यांना स्वतंत्र वर्गाचा दर्जा देऊन आरक्षण देण्याची काय गरज होती? , ओबीसी वर्गाचं आरक्षण वाढवून किंवा त्यातच मराठ्यांना समावून घेत सरकारला ओबीसींना दुखवायचं नव्हतं, म्हणून स्वतंत्र वर्ग निर्माण केला गेला - अॅड. अणे
"मराठ्यांची कितीही नापसंती असली तरी कायद्यानं आता त्यांनाही मागास वर्गात टाकलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे "- अॅड. अणे
मराठा आरक्षणाला विरोध करणा-या याचिकाकर्त्यांच्यावतीनं माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा युक्तिवाद सुरू, सामाजिक आणि शैक्षणिक मागास या धर्तीवर एखाद्या जातीला किंवा समाजाला आरक्षण देणं चुकीचं, ती जात नसून वर्गवारी आहे, यात सर्व जातीची लोकं समावेशित होतात - अॅड. अणे
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्यावतीनं माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा युक्तिवाद सुरू
मागास वर्गातही 'मागास' आणि 'अतिमागास' अशी वर्गवारी असते, त्यामुळे इतर जातींना प्राधान्य देण्याऐवजी मराठ्यांना थेट 16 टक्के आरक्षण देणं चुकीचं, अॅड. अरविंद दातार यांचा युक्तिवाद संपला
पार्थ पवार राज्यपालांच्या भेटीला : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी राज्यपाल सी. विद्यासागर यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे निवदेनाच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधलं. पार्थ पवार यांनी राज्यपालांना निवेदनही साद केलं. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

याचिकाकर्त्यांकडून सरकारच्या विशेषाधिकारालाच आव्हान : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारच्या विशेषाधिकारालाच आव्हान
दिलं आहे.
कोणताही नवा कायदा करताना केवळ राष्ट्रपतीच अधिसूचना जारी करु शकतात.
मात्र इथे राज्य सरकारने जरी कलम 16(4) चा दाखला दिला असला, तरी कलम 342(2) नुसार हे सर्वाधिकार राष्ट्रपतींकडेच आहेत
.
मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्य मागास आयोगाकडे न जाता तो राष्ट्रीय मागास आयोगाकडे जाणं अपेक्षित होतं, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
पुणतांबा अन्नत्याग आंदोलन : उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन मुलींपैकी एकीची प्रकृती खालावली, तहसीलदार व पोलिस मुलीच्या भेटीला.
पुणतांबा अन्नत्याग आंदोलन : उपोषणाच्या चौथ्या दिवशी तीन मुलींपैकी एकीची प्रकृती खालावली, तहसीलदार व पोलिस मुलीच्या भेटीला.
मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर हायकोर्टात सुनावणी : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. "मराठा समाज हा कधीही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल नव्हता. अनेक राजकीय पुढारी, साखर कारखानदार, उद्योजक हे या समाजातील आहेत, असा युक्तिवाद आरक्षणाला विरोध करणाऱ्या संजीत शुक्ला यांच्यावतीने अॅड. अरविंद दातार यांनी केला.

नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी सलग दुसऱ्या दिवशी ईडीच्या कार्यालयात दाखल, लंडनमधील कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशी, वाड्रांना आज 40 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता
रेल्वे अपडेट : मध्य रेल्वेची लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर, दोन तासानंतर कल्याणची लोकलसेवा वेळापत्रकानुसार
कोल्हापूर- पुणे महामार्गावर खंबाटकी घाटात केमिकल टँकर उलटल्याने वाहतूक बंद, अनेक वाहनं घाटात अडकली, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक थांबली
कोल्हापूर- पुणे महामार्गावर खंबाटकी घाटात केमिकल टँकर उलटल्याने वाहतूक बंद, अनेक वाहनं घाटात अडकली, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक थांबली
नाशिक : नांदूरमध्यमेशवर पक्षी निरीक्षण केंद्रात पुन्हा मच्छिमार सक्रिय, प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारीचा प्रकार उघडकीस, वन अधिकाऱ्यांकडून दोन बोटी आणि जाळं जप्त
नाशिक : नांदूरमध्यमेशवर पक्षी निरीक्षण केंद्रात पुन्हा मच्छिमार सक्रिय, प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारीचा प्रकार उघडकीस, वन अधिकाऱ्यांकडून दोन बोटी आणि जाळं जप्त
रेल्वे अपडेट : मध्य रेल्वेची लोकलसेवा उशिराने : मध्य रेल्वेवर कल्याण, डोंबिवली दरम्यान लोकलसेवा उशिराने, मुंबईकडे जाणारी लोकलसेवा 20 ते 25 मिनिटं, तर कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल 15 मिनिटं उशिराने, दोन्ही स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

पुणे : दुरुस्तीसाठी आजही पुण्यात पाणीपुरवठा बंद, तीन आठवड्यापासून दर गुरुवारी पाणीकपात, मात्र पाणीकपाती संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
पुणे : दुरुस्तीसाठी आजही पुण्यात पाणीपुरवठा बंद, तीन आठवड्यापासून दर गुरुवारी पाणीकपात, मात्र पाणीकपाती संदर्भात प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही
दुरुस्तीसाठी रनवे 6 तासांसाठी बंद : मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. 7 फेब्रुवारी ते 30 मार्चंपर्यंत हे काम चालणार आहे. या कामामुळे धावपट्टी 6 तासांसाठी बंद राहिल. 21 मार्च रोजी होळी असल्यामुळे रनवे पूर्ण दिवस सुरु राहणार आहे. हे काम मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत करण्यात येणार आहे.
बैकग्राउंड
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. मराठा समाजाचं 16 टक्के आरक्षण घटनाबाह्य, मुंबई हायकोर्टात आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद, निव्वळ राजकीय खेळी असल्याचा दावा
2. देशातल्या तीर्थक्षेत्रांमध्ये होणाऱ्या महाप्रसादांमध्ये विष कालवण्याचा कट, मुंब्रा,औरंगाबादेतून अटक झालेल्या संशयित दहशतवाद्यांची कबुली
3. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं दुरुस्ती, आठवड्यातील 3 दिवस 6 तास विमान वाहतूक बंद, 21 मार्चनंतर वाहतूक पूर्ववत होणार
4. औरंगाबादेत पोलिसांमध्ये तुफान हाणामारी, वैयक्तिक कारणामुळे मारहाण झाल्याची माहिती, पुंडलिक नगरमधील घटना
5. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची रचना बदलण्याची शक्यता, अश्वारुढऐवजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याचा विचार
6. विदर्भाला सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडक जिंकण्याची संधी; सौराष्ट्राची चौथ्या दिवसअखेर 5 बाद 58 अशी दाणादाण, विजयासाठी 206 धावांचं लक्ष्य