आज दिवसभरात... 31 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau
Last Updated:
31 Jan 2019 08:51 PM
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची भेट अण्णा हजारेंनी नाकारली, अण्णा वकिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यामुळे नाराजी
केंद्र शासनाच्या दुसऱ्या 'खेलो इंडिया' यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राला नंबर वन मिळवून देणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून रोख इनामाची घोषणा, सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी एक लाख, रौप्यविजेत्या खेळाडूंना 75 हजार तर कांस्यविजेत्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचं रोख बक्षीस जाहीर
एनडीएच्या बैठकीवर अकाली दलाचा बहिष्कार, शिखांच्या धार्मिक कार्यात संघाच्या हस्तक्षेपामुळे नाराजी
मुंबई महापालिकेच्या बी वॉर्डमधील नऊ अधिकाऱ्यांना अन्नातून विषबाधा, सर्वांवर जे जे रुग्णालयात उपचार, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती, कार्यालयाच्या कँटीनमध्ये खाल्ल्यानंतर त्रास
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या परिशिष्टाची प्रत द्या, याचिकाकर्त्यांची मागणी, परिशिष्ट जारी केल्यास सर्व प्रतिवादींसह कोर्टालाही त्याची प्रत द्यावी लागेल, इतका मोठा संच उगाच जागा व्यापून टाकणारा, राज्य सरकारची माहिती
राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांना सहा महिन्यांची मुदत वाढ, 31 जानेवारीला जैन यांचा सचिव पदाचा कार्यकाळ संपून ते निवृत्त होणार होते
प्रसिद्ध सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं आकस्मिक निधन, विलेपार्ले स्टेशनवरुन चालताना अचानक अटॅक आल्याने साळवी यांचा मृत्यू
प्रसिद्ध सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं आकस्मिक निधन, विलेपार्ले स्टेशनवरुन चालताना अचानक अटॅक आल्याने साळवी यांचा मृत्यू
औरंगाबाद : रघुवीरनगर इथे उद्योजक कुटुंबावर रात्री उशिरा हल्ला, पारस छाजेड (वय 78 वर्ष), शशिकला छाजेड (वय 70 वर्ष) आणि त्यांचा नातू पार्थ छाजेड जखमी, जखमींवर खाजगी रुग्णालयात दाखल, आरोपी फरार
औरंगाबाद : रघुवीरनगर इथे उद्योजक कुटुंबावर रात्री उशिरा हल्ला, पारस छाजेड (वय 78 वर्ष), शशिकला छाजेड (वय 70 वर्ष) आणि त्यांचा नातू पार्थ छाजेड जखमी, जखमींवर खाजगी रुग्णालयात दाखल, आरोपी फरार
वारकरी-पोलिसांमधील वाद विकोपाला : परभणीत वारकरी-पोलिसांमधील वाद विकोपाला गेला आहे.
पोलीस निरीक्षकाविरोधात मोर्चा काढणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी त्यांच्याविरोधात वारकऱ्यांनी मोर्चा काढला होता, परंतु जमावबंदी असताना विनापरवाना मोर्चा काढला, तसंच पोलिसांची प्रतिमा मालिन केल्याप्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत सलग तिसऱ्या दिवशी थंडी कायम,
तापमान 6.5 अंशावर
बैकग्राउंड
1. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात, दोन्ही सभागृहांमध्ये सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचं भाषण, उद्या अर्थसंकल्प सादर होणार
2. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, प्रकृती ढासळत असल्याने चिंता, लोकपालच्या नियुक्तीसाठी एल्गार, ग्रामस्थांचाही बंद पाळत उपोषणाला पाठिंबा
3.विश्व हिंदू परिषदेची आजपासून धर्म संसद, मोहन भागवतांसह दिग्गजांची हजेरी,तर 21 फेब्रुवारीला साधूसंत राम मंदिरासाठी पहिली वीट रचणार
4. दोन दिवस राज्यभरात थंडीची लाट कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज, परभणीचा पारा 6.5 अशांवर, यवतमाळचा पाराही खालावला
5. सात हजार विद्यार्थ्यांचा 'एक सूर एक ताल', अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेचा उपक्रम, पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आदरांजली
6. चौथ्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, विराटला विश्रांती देऊन रोहित शर्माकडे नेतृत्व, तर शुभमन गिलचंही वनडेत पदार्पण