आज दिवसभरात... 3 फेब्रुवारी 2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau
Last Updated:
03 Feb 2019 03:22 PM
राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांचा अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर- पुणे महामार्गावर सुपा येथे रास्तारोको, आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी
#उल्हासनगर : कॅम्प 3 भागातील मेमसाब इमारतीचा स्लॅब कोसळला,
इमारतीच्या तळमजल्यावरील दवाखान्यातील 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु
इमारतीच्या तळमजल्यावरील दवाखान्यातील 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु
रायपूर येथे भाजप नेत्यांची पक्ष कार्यालयात पत्रकाराना बेदम मारहाण, चार जण अटकेत
INDvsNZ : टीम इंडियाची न्यूझीलंडवर 35 धावांनी मात, कसोटीपाठोपाठ वनडे मालिका 4-1 ने जिंकली
उपेषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धी येथे दाखल
महाजन अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार
महाजन अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार
INDvsNZ : किवींना सातवा धक्का, जेम्स नीशम 44 धावा करुन माघारी परतला, न्यूझीलंडच्या सात बाद 178 धावा, विजयासाठी 13 षटकात 75 धावांची आवश्यकता
#MeToo : बाॉलिवूडचे संस्कारी बाबू आलोकनाथ यांच्यावर सिंटासह 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइज'कडून सहा महिन्यांची बंदी, 'सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन'कडून (सिंटा) आलोक नाथ यांचे सदस्यत्वही रद्द
INDvsNZ : किवींना सहावा गडी माघारी, कॉलिन डी ग्रॅन्डहोम्स 11 धावांवर बाद, न्यूझीलंडच्या सहा बाद 137 धावा,
विजयासाठी 18 षटकात 116 धावांची आवश्यकता
विजयासाठी 18 षटकात 116 धावांची आवश्यकता
INDvsNZ : किंवींना पाचवा धक्का,
टॉम लॅथम 37 धावांवर बाद
टॉम लॅथम 37 धावांवर बाद
INDvsNZ : वेलिंग्टनमध्ये सुरु असलेल्या पाचव्या वन डेत न्यूझीलंडचीही उडाली घसरगुंडी;
किवींचे 85 धावांत 3 गडी तंबूत, भारतीय गोलंदाजांची सामन्यावर पकड
किवींचे 85 धावांत 3 गडी तंबूत, भारतीय गोलंदाजांची सामन्यावर पकड
अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका, शिवसेनेचं सरकारला निवदेन,
मागण्यांची तातडीनं दखल घेण्याची मागणी
मागण्यांची तातडीनं दखल घेण्याची मागणी
अण्णांच्या मनधरणीसाठी गिरीश महाजन पुन्हा राळेगणसिद्धीकडे रवाना, अण्णांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस, प्रकृती बिघाडामुळे डॉक्टरही चिंतेत
काँग्रेसला अयोध्येत राम मंदिर हवं की नको, अमित शाहांचं राहुल गांधींना भूमिका मांडण्याचं आव्हान, काँग्रेसच्या उत्तराकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना अण्णा हजारेंची नोटीस, माफीनाम्याची मागणी, अण्णा पैसे घेऊन आंदोलन करत असल्याचं विधान मलिक यांनी केलं होतं
#INDvsNZ :
भारताच्या सर्वबाद 252 धावा,
रायुडू (90), वी. शंकर (45)आणि हार्दीक पंड्याने (45)भारताचा डाव सावरला
भारताच्या सर्वबाद 252 धावा,
रायुडू (90), वी. शंकर (45)आणि हार्दीक पंड्याने (45)भारताचा डाव सावरला
INDvsNZ
अंबाती रायुडू 90 धावांवर बाद
रायुडूने भारताचा डाव सावरला, भारत सुस्थितीत
भारत 190 (6)
अंबाती रायुडू 90 धावांवर बाद
रायुडूने भारताचा डाव सावरला, भारत सुस्थितीत
भारत 190 (6)
INDvsNZ : अंबाती रायुडू आणि विजय शंकर यांनी भारताचा डाव सावरला
भारत : 4 बाद 81 धावा (24 षटके)
भारत : 4 बाद 81 धावा (24 षटके)
INDvsNZ : टीम इंडियाला चौथा धक्का
एक धाव करुन महेंद्रसिंग धोनी माघारी परतला
एक धाव करुन महेंद्रसिंग धोनी माघारी परतला
- INDvsNZ : सलामीची जोडी तंबूत परतली
- रोहित दोन तर शिखर धवन सहा धावांवर बाद
- रोहित दोन तर शिखर धवन सहा धावांवर बाद
बिहारच्या वैशालीमध्ये सीमांचल एक्स्प्रेसचे 9 डबे रूळावरून घसरले, दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, तर 12 हून अधिक लोक जखमी, बचावकार्यासाठी 2 एक्स्प्रेस घटनास्थळी दाखल
पश्चिम रेल्वेवरील महामेगाब्लॉक संपला, पश्चिम रेल्वे मार्गावरुन पहिली एक्सप्रेस रवाना, थोड्याच वेळात चर्चगेटहून लोकलसेवा सुरु होणार
बिहारच्या हाजीपूरजवळ सिमांचल एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत काहीजण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
- INDvsNZ : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, धोनी, शमी, विजय शंकरची वापसी
बैकग्राउंड
- सकाळी 9 वाजेपर्यंत लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान लोकलसेवा रद्द, मध्यरात्रीपासून लोअर परळ उड्डाणपुलावर गर्डर काढण्याचं काम सुरू, बेस्टच्या जादा बसेस धावणार
- आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, पुणे विशेष न्यायालयाच्या निर्णयाने पुणे पोलिसांना हादरा, मुदतीआधीच कारवाई केल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना सुनावलं
- भूकंपाच्या एकामागोमाग एक धक्क्यांनी डहाणूकरांमध्ये दहशत, एनडीआरएफच्या टीमकडून पाहणी, तर भूगर्भातील हालचालींनी बंद पडलेल्या बोअरला पाणी
- भारत विरूद्ध न्यूझीलंडचा आज पाचवा वन डे सामना, हॅमिल्टनच्या पराभवाचा वचपा काढण्य़ाची संधी, धोनीच्या पुनरागमनाने संघाला बळकटी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -