LIVE BLOG | आज दिवसभरात... 13 फेब्रुवारी 2019

देशभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 13 Feb 2019 08:36 PM
राष्ट्रवादी जागा वाटप बैठक, नगरच्या जागेवरून तिढा कायम, नगरची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नाही, काँग्रेसला राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी हवा नगर मतदारसंघ, काँग्रेसला नगरची जागा मिळाली नाही तरीही सुजय अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
मुंबई : राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात एका मित्राच्या घरी बैठक, दुपारी 4 वाजताच्या सुमारास दोघांचाही मित्र असलेल्या एका व्यक्तीच्या घरी दादरमध्ये बैठक, साधारण एक ते दीड तास चर्चा
विद्यार्थिनीच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार, न्हावा येथील शाळेतील प्रकार
शरद पवार पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित
चला हवा येऊ द्यामध्ये अलिबागची अवहेलना झाल्याच्या गैरसमजातून अलिबागकरांचा संताप मात्र अलिबाग नव्हे तर आलेपाक शब्द असल्याच्या स्पष्टीकरणानंतर वाद निवळला
गळाभेट आणि गळ्यात पडणं यातला नेमका फरक पहिल्यांदा कळला, सोळाव्या लोकसभेतील शेवटच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला
नागपुरात मुजोर रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण, नियमबाह्य पार्किंगवर वाहतूक पोलिसानं कारवाई केल्यामुळे संताप, 1 रिक्षाचालक ताब्यात
आता फेसबुकवर फेक पोस्ट मेसेजद्वारे कळणार, निवडणुकांच्या तोंडावर खबरदारीसाठी फेसबुकचं पाऊल, औरंगाबादेत सेंटर
2014 ला मीही तुम्हाला सगळ्यांप्रमाणे पहिल्यांदाच लोकसभेत आलो. प्रत्येक गोष्ट कुतूहलाने पाहत होतो. माझ्या बाकावर ( पंतप्रधानांची जागा) जी प्लेट लागली आहे, त्यात फक्त तीनच पंतप्रधानांची नावे का आहेत हे मात्र मला समजलं नाही.- सोळाव्या लोकसभेच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान मोदी.


मुंबई, पुणे आणि नाशिकमधील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच म्हाडाच्या घराची लॉटरी निघणार आहे. मुंबई, पुणे, नाशिकमधील हजारों घरांसाठी आचारसंहिता लागण्याआधी लाॅटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. तर औरंगाबादमध्ये आचारसंहितेनंतर या घरांसाठी लॉटरी निघणार आहे.
जम्मू काश्मिर : पुलवामा भागातील खासगी शाळेत स्फोट, दहावीच्या वर्गातील 10 विद्यार्थी जखमी
महाराष्ट्रात 28 फेब्रुवारीच्या आधी महाआघाडी घोषित होण्याची शक्यता, महाआघाडी घोषित करुन राहुल गांधी, शरद पवार भव्य सभा घेणार, या सभेला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री कमलनाथ, अशोक गेहलोत राहणार उपस्थित
महाराष्ट्रात 28 फेब्रुवारीच्या आधी महाआघाडी घोषित होण्याची शक्यता, महाआघाडी घोषित करुन राहुल गांधी, शरद पवार भव्य सभा घेणार, या सभेला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री कमलनाथ, अशोक गेहलोत राहणार उपस्थित
माढा मतदारसंघातून शरद पवारच निवडणूक लढणार,राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती, मुंबईतील बैठकीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता
नवी दिल्ली : शरद पवारांच्या 6 जनपथवर महाराष्ट्रातल्या आघाडीबाबत महत्त्वाची बैठक सुरु, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, सुप्रियाताई सुळे उपस्थित, महाराष्ट्रातल्या जागावाटपाला अंतिम रुप देण्यासंदर्भात चर्चा
राज्य शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, मल्लखांबपटू उदय देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, 2013 मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या साताऱ्याच्या प्रियांका मोहितेला साहसी पुरस्कार, 17 फेब्रुवारीला गेटवे ऑफ इंडियाला पुरस्कार वितरण सोहळा
राफेल करारासंदर्भात कॅगचा अहवाल राज्यसभेत सादर, यूपीएच्या तुलनेत मोदींनी केलेला करार 2.86 टक्क्यांनी स्वस्तच
शरद पवारांच्या नेतृत्त्वात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते हजर राहणार, लोकसभा निवडणूक आणि महाआघाडीच्या रणनितीबाबत चर्चा होणार, संभाव्य उमेदवारांबाबतही चाचपणी होणार
शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते हजर राहणार, लोकसभा निवडणूक आणि महाआघाडीच्या रणनीतीबाबत होणार चर्चा, संभाव्य उमेदवारांबाबतही होणार चाचपणी
संसद परिसरात काँग्रेसची निदर्शनं, राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दुपारी 3.30 वाजता पुन्हा पत्रकार परिषद घेणार
संसद परिसरात काँग्रेसची निदर्शनं, राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दुपारी 3.30 वाजता पुन्हा पत्रकार परिषद घेणार
भीमा कोरेगाव केसमध्ये महाराष्ट्र सरकारला दिलासा, सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतर पाच लोकांच्या चौकशीसाठी वेळ वाढवून न देण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द
ठाणे लोकसभा उमेद्वाराबाबत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक, आनंद परांजपे आणि नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहर अध्यक्षांची बैठक सुरु, ठाण्यातून गणेश नाईक यांनी उमेदवारी फायनल होण्याची शक्यता
रायगडचे आमदार सुरेश लाड यांचं उपोषण मागे, चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याची कामं तातडीने सुरु करण्याचं आश्वासन दिल्यानंतर निर्णय
रायगडचे आमदार सुरेश लाड यांची प्रकृती खालावली, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने ग्लानी, कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाविरोधात उपोषणाला बसले असताना रात्रीच्या सुमारास तब्येतीत बिघाड

बैकग्राउंड

1. बुलडाण्यात एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त, एक जण पोलिसांच्या ताब्यात, फरार आरोपींचा शोध सुरु

2. विरारमध्ये बारचालकाला मनसे पदाधिकाऱ्याचा चोप, कॅन्सर पीडित रुग्णाची फसवणूक केल्याचा आरोप

3. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडून दोन हजार कोटींचा निधी मंजूर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, पशुस्वास्थ्य योजनेलाही मंजुरी

4. प्रियांका गांधींच्या खांद्यावर यूपीतल्या 42 जागांची धुरा, मोदींच्या वाराणसी, योगींच्या गोरखपूर, वरुण गांधींच्या सुलतानपूर मतदारसंघांत काँग्रेसचा प्रचार करणार

5. हवाई दलाचं मिग-27 राजस्थानच्या जयपूरमध्ये कोसळलं, वैमानिक सुरक्षित, दुर्घटनेची चौकशी होणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.