आज दिवसभरात... 25 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau
Last Updated:
25 Jan 2019 08:29 PM
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार, सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार
अयोध्या खटल्यासाठी नव्या खंडपीठाची स्थापना, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर 29 जानेवारीला सुनावणी
शिवसेना-भाजपची युती होणारच, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विश्वास, कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे, शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार, पाटलांची ग्वाही
लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी गौरव
नवी दिल्ली : राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 44 पोलिसांचा गौरव, चार जणांना राष्ट्रपती पोलीस पुरस्कार, तर 40 पोलिसांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार
सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाची रणजी करंडकाच्या अंतिम फेरी धडक, उपांत्य सामन्यात केरळचा एक डाव 11 धावांनी धुव्वा
सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाची रणजी करंडकाच्या अंतिम फेरी धडक, उपांत्य सामन्यात केरळचा एक डाव 11 धावांनी धुव्वा
नवी दिल्ली : खुल्या वर्गातील दुर्बलांना आर्थिक आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, चार आठवड्यांनी पुन्हा सुनावणी
नवी दिल्ली : खुल्या वर्गातील दुर्बलांना आर्थिक आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, चार आठवड्यांनी पुन्हा सुनावणी
नाशिक : भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश, गंगापूर रोडवर सावरकरनगरमधील घटना
नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी, बिबट्याच्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी
26 जानेवारीनिमित्त दादरची स्कायलाईन, कोहिनूर टॉवर झळाळून उठणार, आज संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत एलईडी लाईट, अॅनिमेशनने कोहिनूर टॉवर चारही बाजूंनी झळाळून उठणार
26 जानेवारीनिमित्त दादरची स्कायलाईन, कोहिनूर टॉवर झळाळून उठणार, आज संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत एलईडी लाईट, अॅनिमेशनने कोहिनूर टॉवर चारही बाजूंनी झळाळून उठणार
नवी मुंबई : वाशीच्या आयनॉक्स थिएटरमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ, 'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर न लावल्याबद्दल जाब विचारला, पोस्टर न लावल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा
नवी मुंबई : वाशीच्या आयनॉक्स थिएटरमध्ये शिवसैनिकांचा गोंधळ, 'ठाकरे' सिनेमाचे पोस्टर न लावल्याबद्दल जाब विचारला, पोस्टर न लावल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा
नागपूर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाची सर, सकाळपासून ढगाळ वातावरण, मौदा तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस
बैकग्राउंड
1. आता निवडणुका झाल्यास देशात त्रिशंकू स्थितीची शक्यता, एबीपी-सी वोटरचा सर्व्हे, महाराष्ट्रात युती झाली नाही तर आघाडीचा झेंडा
2. युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टीची मागणी, तर भाजपची 126 जागा देण्याची तयारी, 4 ते 5 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती
3. कर्जप्रकरणी व्हिडीओकॉनचे वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याविरोधात गुन्हा, मुंबई, औरंगाबादसह चार ठिकाणी सीबीआयचे छापे
4. रशियाजवळ कर्चच्या समुद्रात दोन तेलवाहू जहाजांची टक्कर, 14 खलाशांचा मृत्यू, तर बेपत्ता असलेल्या 9 खलाशांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश
5. लान्स नायक नाजीर वानींना अशोकचक्र पुरस्कार, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून वीरमरण, दहशतवादी ते सैनिक प्रवासाची आठवण
6. मोठ्या प्रमाणात पाणी लागणाऱ्या ऊसाला शुगर बीटचा पर्याय, हिंगोलीमध्ये देशातील पहिल्या प्रयोगाला सुरुवात, वसमतचा कारखाना करणार साखर निर्मिती