आज दिवसभरात... 28 जानेवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 28 Jan 2019 10:37 PM
जालना | शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या रावसाहेब भवरची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून हात वर, जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्याने भवरची हकालपट्टी केल्याची दानवेंची माहिती, मारहाणीचं कदापि समर्थ नाही, पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना
LIVETV | एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करणार, साखर आयुक्तांच्या आश्वासनानंतर खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वातील पुण्यातलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन तात्पुरतं स्थगित
काँग्रेसचे महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी मुंबईत संसदीय समितीची उद्या आणि परवा बैठक, नाव निश्चित करुन दिल्लीत उमेदवारांची यादी पाठवणार
पुण्यातील रस्त्यांवर असंख्य शेतकऱ्यांनी ठाण मांडलं, साखर आयुक्तांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींचा पवित्रा
नागपूर : शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करणाऱ्या मुलींवर पैसे उधळणारा पोलिस कर्मचारी प्रमोद वाळके निलंबित, तर दोन पोलिसांची मुख्यालयात बदली
सातारा : मलकापूर नगरपरिषदेत काँग्रेसचा विजय, 19 जागांपैकी 14 जागांवर काँग्रेस, तर 5 जागांवर भाजप विजयी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाच्या सर्व खासदरांची मातोश्रीवर बैठक सुरु
#रायगड : कर्जतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय, सुवर्णा जोशी नव्या नगराध्यक्ष
सातारा एसटी डेपोतील डिझेल संपल्याने लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या खोळंबल्या, सर्व शिवशाही बस जागेवर, मुंबई-पुणे जाणारे प्रवासी अडकले
राज्य मागास प्रवर्गाचा संंपूर्ण अहवाल याचिकाकर्ते आणि विरोधकांना द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सुनावणीस सुरुवात, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मागे
#INDvsNZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी वनडे : न्यूझीलंडचा डाव 243 धावांत आटोपला, भारतासमोर विजयासाठी 244 धावांचं आव्हान
#INDvsNZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी वनडे : न्यूझीलंडचा डाव 243 धावांत आटोपला, भारतासमोर विजयासाठी 244 धावांचं आव्हान
श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. 19 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत 71 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत 84 टक्के मतदान झाले असून आज श्रीगोंदा येथील नगरपरिषदच्या सामाजिक केंद्र या ठिकाणी मतमोजणी होत आहे. 19 नगरसेवकांत दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत असून यात भाजपाकडून सुनीता मच्छिंद्र शिंदे, काँग्रेस आघाडीकडून शुभांगी मनोहर पोटे तर संभाजी ब्रिगेडकडून सिराबजी कुरेशी या मैदानात आहेत. यापूर्वी नागरपरिषदेवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे आता नागरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

सातारा : मलकापूर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु, 19 जागांपैकी दोन जागांवर भाजप विजयी, अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं पॅनल आमनेसामने
नाशिक : आतेबहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमातील भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार उपचारांदरम्यान तरुणाचा मृत्यू
नाशिक : आतेबहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमातील भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार उपचारांदरम्यान तरुणाचा मृत्यू
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र, भाजपची जालन्यात तर शिवसेनेची मुंबईत बैठक, राजकीय प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता

बैकग्राउंड

1. मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी, मागास प्रवर्गाच्या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना देण्यावर निर्णय होणार

2. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र, भाजपची जालन्यात तर शिवसेनेची मुंबई बैठक, राजकीय प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता

3. पोकळ स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते, नितीन गडकरींचा सूचक इशारा, गडकरी मोदींविरोधात बोलल्याची दबक्या आवाजात चर्चा

4. आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात तपास अधिकाऱ्याची बदली, चौकशीला विलंब केल्याचा ठपका, सीबीआयकडून मात्र अधिकृत निवेदन नाही

5. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, घटनापीठापुढील उद्याची सुनावणी रद्द, न्यायमूर्ती बोबडे अनुपस्थित राहणार असल्याने निर्णय

6. भारत-न्यूझीलंड दरम्यान आज तिसरा एकदिवसीय सामना, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी,  मालिका विजयाची भारताला संधी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.