आज दिवसभरात... 02 फेब्रुवारी 2019

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

ABP News Bureau Last Updated: 02 Feb 2019 03:04 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोलकात्यामधील रॅलीदरम्यान प्रचंड गर्दीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ, गोंधळामुळे मोदींवर भाषण आटोपतं घेण्याची वेळ
बीड : पाच लाखांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे जाळ्यात. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्कर देण्यासाठी मागितली लाच.
ठाकरे कुटुंबातील नवदाम्पत्य अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजबाहेर मनसैनिकांची गर्दी
अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राळेगणसिद्धीचे नागरिक आक्रमक, जेलभरो आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं
मला कुवतीपेक्षा खूप जास्त मिळालं, त्यामुळे पंतप्रधानपदाचा कोणताही लोभ नाही, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण
अण्णांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस, राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी केले रास्तारोको आंदोलन, जेलभरोही करणार
बुलढाणा : शेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लिपिकासह एसीबीच्या जाळ्यात, जमिनीच्या एनएसाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
माझं जर काही बरं वाईट झालं तर जनता नरेंद्र मोदींना धरेल : अण्णा हजारे, एक जानेवारी रोजी अण्णा हजारेंनी मोदींना लिहलेल्या पत्राला मोदींचे उत्तर
एनडीआरएफची दोन पथकं पालघरमध्ये पोहचली, भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना भूकंपानंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक देणार, 200 टेंट आणि आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधनं घेऊन पथकं पोहोचलं
अंतरिम अर्थसंकल्पासाठी राज्यघटनेत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत अर्थसंकल्पाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णांच्या वजनात घट झाली असून, साडे तीन किलोने त्यांचं वजन कमी झालं आहे. सरकार अण्णांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला आहे.
मुंबई पोलीस बनून दोन इराणींनी येमेनच्या नागरिकाला लुटले, विक्रोळी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या
प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महापालिकेने शुक्रवारपासून कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी प्लास्टिक बाळगणाऱ्या 6 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे.
पालघर ब्रेकिंग : पालघर जिल्ह्यात काल दिवसभरात एकामागोमाग एक भूकंपाच्या 6 धक्क्यांनी हादरलं आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या भागात आरोग्य विभाग आणि एनडीआरएफच्या टीमना रहिवासी भागात पाचारण करण्यात आलं आहे. तसंच कच्च्या बांधकामाची घर असलेल्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.


अर्बन नक्षलवाद प्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईमध्ये ही कारवाई केली. तेलतुंबडेंवर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. पुणे न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान तेलतुंबडेंना आज न्यायालयात हजर केलं जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अर्बन नक्षलच्या आरोपावरुन डॉ. आनंद तेलतुंबडेंना मुंबई पोलिसांकडून अटक, विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु
लोअर परळच्या पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात येणार आहे.. रात्री दहा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही.

बैकग्राउंड

1. मोदी सरकारच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा, पाच लाखांपर्यंतचंच उत्पन्न करमुक्त, एफडीतून मिळणाऱ्या व्याजातही करसवलत

2. निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्पात करसवलत देऊन मोदींचा मास्टरस्ट्रोक, कामगारांना बोनस-पेन्शन सुरू, तर सैनिकांचं पेन्शन दुप्पट

3. अल्प भूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार मिळणार, तर दिवसाला 17 रूपये देणारा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचा अपमान, राहुल गांधींची टीका

4. एकामागोमाग एक भूकंपांच्या धक्क्यांनी पालघर पुन्हा हादरलं, काल दिवसभरात 6 धक्के, घरातून पळ काढताना चिमुकलीचा मृत्यू

5. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस, अण्णांच्या वजनात साडे तीन किलोनं घट, सरकार दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

6. काश्मीरच्या राजौरीमध्ये जोरदार बर्फवृष्टी, तर क्रिकेटची मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्डस स्टेडिअमवरही बर्फाची चादर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.